बियर होणार महाग - तोंडच पाणी पळण्याआधी जाणून घ्या काय असणार आहेत दर | Beer Rates Wiil Change In MH

2021-09-13 0

मद्यपाना विषयी भारतात नाकं मुरडली जात असली तरी, मद्यपानाचा मोठा पुरस्कर्ता वर्ग भारतात आहे. पण मध्याचा कडवटपणा तुमच्या जोभेवरून सरकून पाकीटाकडे जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिअर आजपासून महागली असून, त्याचे दर ३ ते ६ रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. राज्य सरकारने बिअरवरील उत्पादन शुल्कात २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने ही दरवाढ होणार आहे. याची अंमलबजावणी तत्काळ म्हणजेच आजपासून करण्यात आल्याने बिअरप्रेमी नाराज झाले आहेत. आजपासून सौम्य बिअरच्या छोट्या बाटलीसाठी ३ रूपये ज्यादा द्यावे लागतील तर स्ट्राँग बिअरच्या छोट्या बाटलीसाठी ४ रुपये ५ पैसे ज्यादा द्यावे लागतील. सौम्य बिअरच्या मोठ्या बाटलीसाठी ५ रूपये ज्यादा द्यावे लागतील तर स्ट्राँग बिअरच्या मोठ्या बाटलीसाठी ६ रुपये ५ पैसे ज्यादा द्यावे लागतील.विविध कंपन्यांच्या बिअरची किंमत वेगवेगळी आहे, त्यामध्ये कोणत्या कंपनीची बिअर जास्त महाग होणार हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. किंगफिशर, बडवायझर, कार्ल्सबर्ग सारख्या बिअर कंपन्यांच्या छोट्या बाटलीची किंमत ही ६० ते ११० रूपयांपर्यंत आहे तर मोठ्या बाटलीची किंमत ११० रूपये ते २३० रुपयांच्या घरात आहे. उद्पातन शुल्कवाढीमुळे विभागाला १५० कोटींचा अधिक महसूल मिळणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात उत्पादन शुल्क विभागाने १२ हजार २८८ कोटींचा महसूल गोळा केला होता या आर्थिक वर्षात हा आकडा १४ हजार कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. पण या मुळे तळीराम मोठ्या तळ्यात पडल्यावाचून राहतील हे ही खरे

Videos similaires